Ad will apear here
Next
आदिवासींच्या प्रत्येक बोलीभाषेसाठी पाठ्यपुस्तके तयार व्हावीत : डॉ. प्रकाश आमटे
‘माडिया शिकू या’ पुस्तकाचे प्रकाशन


पुणे :
‘देशाच्या लोकसंख्येत दहा टक्के असणारा आदिवासी समाज एके काळी जंगलाचा राजा होता. या समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी शिक्षणाची गरज आहे; मात्र शिक्षण घेताना भाषा हीच त्यांच्या समोरची मुख्य अडचण आहे. ‘माडिया शिकू या’ या पुस्तकाच्या माध्यमातून ही अडचण दूर होण्यास मदत होईल. अशी पुस्तके आदिवासींच्या प्रत्येक बोलीभाषेत तयार करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. 

आदिवासी विकास विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेले ‘माडिया शिकू या’ हे पाठ्यपुस्तक व अभ्यासपुस्तक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात एक जुलै रोजी प्रकाशित झाले. त्या वेळी डॉ. प्रकाश आमटे बोलत होते. या वेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे, जर्मन भाषातज्ज्ञ तथा माडी भाषेच्या अभ्यासक डॉ. मंजिरी परांजपे, संस्थेच्या उपसंचालिका माधुरी यादवाडकर, माडिया समाजाची विद्यार्थिनी मनीषा मदजी आदी उपस्थित होते. 

डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, ‘आदिवासी समाज आणि त्यांची संस्कृती ही मुळातच समृद्ध आहे; मात्र त्यांच्यात असणाऱ्या शिक्षणाच्या आभावामुळे त्यांना नागर संस्कृतीसोबत जुळवून घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत असून अंधश्रद्धेच्या जोखडातून हा समाज आता मुक्त होत आहे. या समाजातील अनेक तरुण शिक्षण घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत.’ 

डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, ‘सध्याचा मुख्य प्रवाहातील समाज अनेक प्रश्नांनी गोंधळला आहे. या समाजाच्या प्रश्नांची उत्तरे आदिवासी समाजाच्या संस्कृतीत दडलेली आहेत. आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अनेक उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. बोलीभाषा या संस्कृतीच्या वाहक असून, त्यांच्या संवर्धनाचे काम होणे आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या पाठीशी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था उभी राहणार आहे.’



या वेळी ‘कोड ऑफ एथिक्स’ आणि प्रमुख ११ आदिवासी भाषांच्या क्रमिक पुस्तकांसाठी वापरण्याच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन, तसेच इयत्ता पहिलीसाठी मराठी अभ्यासक्रमावर आधारित बोलीभाषेतील दृक्श्राव्य साहित्य असलेल्या पेनड्राइव्हचे लोकार्पण करण्यात आले. 

या वेळी पुस्तकाच्या लेखिका डॉ. मंजिरी परांजपे, मनीषा मदजी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. पुस्तकाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. 

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची ओळख करून देऊन संस्थेच्या कार्याबाबतची माहिती संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले, तर आभार विनीत पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला अभ्यासक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

(मराठीच्या विविध बोलीभाषांबद्दलचा बोलू बोलीचे बोल हा लेख वाचण्यासाठी आणि विविध बोलींतील व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZYSCC
 They would be useful to specialists who study Languages .
But ,as text-books ?
 Even books catering to entertainment do not sell well.
 Why should anybody be inclined to learn this language ?
Similar Posts
माडिया भाषेतील पहिल्या पुस्तकाची निर्मिती पुणे : महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगडमधील बस्तर भागातील आदिवासींच्या ‘माडिया’ भाषेतील लिखित स्वरूपातील पहिले पुस्तक पुणे विद्यापीठातील जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. मंजिरी परांजपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आहे.
रुषाताई वळवी यांना बाया कर्वे पुरस्कार पुणे : ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने दर वर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना बाया कर्वे पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विकासासाठी कार्य करणाऱ्या रुषाताई रामसिंग वळवी यांना जाहीर झाला आहे.
विश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात जाऊन ‘शांततेचा संदेश’ द्यावा, असे पुण्यातील उदय जगताप या तरुणाला प्रकर्षाने वाटते. आपले सहकारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि दृढनिश्चयाच्या बळावर तो या स्तुत्य, अनुकरणीय उपक्रमात यशस्वी होतो. तो एक विश्वविक्रम ठरतो. गेल्या वर्षी झालेल्या या विक्रमाची कहाणी ‘विश्वविक्रमी
‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ आरत्यांमध्ये हमखास चुकीच्या म्हटल्या जाणाऱ्या शब्दांवर कोटी करणारे संदेश हल्ली सोशल मीडियावर फिरत असलेले दिसतात. अशाच काही संदेशांवरूनच पुण्यातील सायली दामले यांना एक भन्नाट कल्पना सुचली. प्रबोधनाचा उद्देश ठेवून त्यांनी या चुकीच्या शब्दांना गंमतशीर चित्रांमध्ये उतरवलं. ‘उच्चारण’ या नावाने सुरू केलेली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language